धक्कादायक! पोलीस भरतीत पोलिसांनीच केला घोटाळा

116

जम्मू- काश्मीरमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी झालेल्या लेखी परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने जम्मू व काश्मीर पोलीस दलातील एक सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि सीआरपीएफचा एक हवालदार अशा दोन पोलिसांना अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत अन्य दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या चौघांना अटक केल्यानंतर आता या घोटाळ्यातील एकूण अटक केलल्या आरोपींची संख्या 13 झाली आहे.

5 ते 10 लाख रुपयांना या प्रश्नपत्रिकेची विक्री

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू- काश्मीर पोलिस दलात पॅकेजिंग विभागात कार्यरत असलेल्या अशोक कुमार या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची काॅपी करत त्याची विक्री केली होती. याकरता त्याने सीआरपीएफमध्ये हवालदार असलेल्या सुरेंद्र यादव याची मदत घेतली होती. या दोघांनी 5 ते 10 लाख रुपयांना या प्रश्नपत्रिकेची विक्री केली होती.

( हेही वाचा: अनिल परबांच्या अडचणीत वाढ; साई रिसाॅर्ट प्रकरणी दापोलीत गुन्हा दाखल )

सीबीआयची 33 ठिकाणी छापेमारी

विशेष म्हणजे या लेखी परीक्षेमध्ये अशोक कुमार याचा मुलगा, मुलगी आणि जावई हे मेरिट लिस्टमध्ये आले होते. या प्रकरणी सीबीआयने 33 ठिकाणी छापेमारी केली आणि या चौघांना अटक केली आहे. गेल्या मार्चमध्ये ही पोलीस भरती परीक्षा झाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.