ठाण्यातील विवियाना माॅलमध्ये सोमवारी प्रेक्षक हर हर महादेव सिनेमा पाहण्यासाठी आले. मात्र, या प्रेक्षकांना पाॅलिटिकल पिक्चर पाहायला मिळाला. विवियाना माॅलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. वर्तकनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या या आंदोलनानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी विवियाना माॅल गाठले आणि चित्रपटाचा शो पुन्हा सुरु केला. यावेळी अविनाश जाधव यांनी शो बंद करुन दाखवा, असे थेट आव्हान आव्हाडांना दिले. विवियाना माॅलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. वर्तकनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 141,143, 146,149,323,504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी परिक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( हेही वाचा: रेल्वेच्या आरक्षित तिकीटात काळाबाजार; विविध रेल्वेस्थानकांची आरक्षित 16 हजार तिकीटे हस्तगत )
चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढले
संभाजीराजे छत्रपती यांनी हर हर महादेव सिनेमावर आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादीनेही या वादात उडी घेतली. ठाण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना माॅलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढले. यावेळी तेथील मॅनेजर आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड हाणामारी देखील झाली. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मध्यस्थी केली. मात्र, या मारहाणीत एका प्रेक्षकाचे कपडे फाडल्याचे कॅमे-यात कैद झाले आहे.
Join Our WhatsApp Community