विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनमध्ये चार संघ पोहोचले आहेत. त्यामध्ये इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझिलंड या टीमचा समावेश आहे. 9 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि न्यूझिलंड या संघात सामना खेळला जाणार आहे. तर 10 नोव्हेंबरला भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात मॅच होणार आहे. सध्या टीम इंडिया एडिलेड या मैदानात सराव करत आहे. तिथे टीम इंडियाची न्यूझिलंडविरुद्ध मॅच होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सराव करत असताना, जखमी झाला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. रोहित जखमी झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का मानला जात आहे. रोहितच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. विशेष म्हणजे ही जखम गंभीर असल्याचा कोणताही रिपोर्ट अद्याप जाहीर झालेला नाही.
( हेही वाचा: T-20 World Cup: फलंदाजाकडून महिलेवर बलात्कार, संघाने केली हकालपट्टी )
एडिलेडच्या मैदानात सराव करत असताना ज्यावेळी रोहितच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी तिथे अन्य खेळाडूही उपस्थित असल्याचे व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. तसेच हाताला जखम झाल्यानंतर रोहित सराव थांबवून एका बाजूला बसल्याचे दिसत आहे.
Here’s Rohit batting in the nets after the injury scare. The ice pack did the trick pic.twitter.com/71Qws06XLl
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) November 8, 2022
रोहित खेळणार का?
ज्यावेळी रोहित शर्माला जखम झाली. त्यावेळी रोहितने काहीवेळ विश्रांती घेतली. काही वेळानंतर त्याने नेटमध्ये पुन्हा सराव केल्याचे बोलले जात आहे. पुढच्या सामन्यात खेळण्यासाठी रोहित फीट आहे का? याबाबतदेखील चाचणी घेतली जाणार आहे.
रोहित नसेल तर नवा कर्णधार कोण?
सध्या भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा रोहितकडे आहे. तर उपकर्णधार के.एल.राहूल आहे. जर रोहित दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर संघाची कमान के.एल.राहूलकडे सोपवली जाईल. परंतु मागच्या काही सामन्यातील राहुलची कामगिरी पाहता, हार्दिक पांड्याच्या खांद्यावर कर्णधार पदाची धुरा सोपवली जाऊ शकते. अद्याप तरी रोहित पुढचा सामना खेळणार की नाही याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Join Our WhatsApp Community