Reel करा पैसे मिळवा ते शेड्यूल करून पोस्ट करा; काय आहेत इन्टाग्रामचे नवे भन्नाट फिचर्स?

165

गेल्या काही वर्षात इन्स्टाग्राम युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इन्स्टाचे भन्नाट फिचर्स, नवनव्या फिचर्समुळे इन्स्टा युजर्सला आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. इन्स्टाग्रामचे असे नवे आणि भन्नाट फिचर्स काय आहेत याची सविस्त माहिती जाणून घेऊया…

( हेही वाचा : पश्चिम रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! दहावी-बारावी पास करू शकतात अर्ज; ही आहे शेवटची तारीख)

शेड्यूल करून पोस्ट करा

इन्स्टाग्रामने नवा अपडेट रोलआऊट केला आहे. आता युजर्स ७५ दिवस आधीच इन्स्टाग्रामवर पोस्ट किंवा रिल्स शेड्यूल करू शकतात. याआधी इन्स्टाच्या मोबाईल व्हर्जनवर ही सुविधा उपलब्ध नव्हती परंतु आता क्रिएटरने दिलेल्या नव्या माहितीनुसार आपल्याला पोस्ट किंवा रिल्स शेड्यूल करता येणार आहे. यामुळे नक्कीच वेळ वाचेल.

तसेच इन्स्टा achievement या नव्या फिचरची सध्या चाचणी करत आहे यामुळे युजर्सला नव्या रिल्स करण्यास प्रोत्साहन मिळणार असून त्यांच्या कष्टांशी पोचपावती सुद्धा मिळणार आहे.

इन्स्टाग्रामवरून कमवा पैसे

इन्स्टाच्या या फिचरची अलिकडे सर्वाधिक चर्चा सुरू आहे. मेटाने फेसबुक आणि इन्स्टाग्राम क्रियेटर्स (Instagram creators) साठी एक नवीन फिचर लॉंच केले आहे त्यामुळे युजर्स आता इन्स्टाग्रामवरून पैसे कमवू शकतील. मेटा कंपनीने डिजिटल कलेक्‍टिबल टूल जोडण्‍याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या डिजिटल कलेक्टिबल्समध्ये व्हिडिओही असू शकतात. या माध्यमातून आता इन्स्टावर सुद्धा पैसे कमवता येणार आहेत. लवकरच भारतात सुद्धा हे फिचर सुरू होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instagram’s @Creators (@creators)

पोस्ट आणि रिल्स QR कोडद्वारे शेअर करा 

इन्स्टाग्राम पोस्ट आणि रिल्स आता आपण क्यू आर कोडद्वारे शेअर करू शकतो. पोस्ट किंवा रिल्समध्ये थ्री-डॉट मेन्यूवर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला शेअर विथ क्यू आर कोड हा पर्याय दिसेल. याद्वारे तुम्ही पोस्ट किंवा रिल्स शेअर करू शकता.

ग्रुप चॅट व्होट ( Group Chat Vote )

इन्स्टाग्रामवर तुम्ही तुमच्या मित्रांचा ग्रुप बनवला असेल तर तुम्ही चॅटमध्ये पोल टाकू शकता. उदाहरणार्थ डिनरला कुठे जायचे किंवा कोणत्या जागी भेटायचं याचा पोल तुम्ही चॅटमध्ये तयार करू शकता. यामध्ये तुमचे मित्र-मैत्रिणी मत नोंदवू शकतात.

इन्स्टाग्राम नोट्स (Instagram Notes)

आपण जिथून युजर्सला डायरेक्ट मेसेज करतो तिथे हा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही येथे तुमचे विचार ६० शब्दांपर्यंत नमूद करू शकता. २४ तास हे नोट्स व्हिसिबल राहतात.

क्लोज फ्रेंड्स ( Close Friends )

अलिकडे इन्स्टाग्रामवर सर्वजण सक्रिय असतात अशावेळी तुम्हाला तुमचे वैयक्तिक फोटो किंवा विचार काही मोजक्या लोकांपर्यंत शेअर करायचे असतील तर क्लोज फ्रेंड्स हा पर्याय निवडा. यामुळे तुम्ही ज्या लोकांना क्लोज फ्रेंड्सच्या यादीत ठेवलंय फक्त त्यांनाच तुमच्या स्टोरीज दिसतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.