‘सत्तारांच्या विधानाचे समर्थन नाहीच, पण…’ फडणवीसांनी केले स्पष्ट

146

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्य सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने तीवर् आंदोलन छेडत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, अब्दुल सत्तार यांच्या विधानाचं आपण कुठल्याही प्रकारे समर्थन करणार नसल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच दोन्ही बाजूंनी अशा टीका करणे योग्य नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

सत्तारांच्या विधानाचं समर्थन नाही

कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही देखील त्याचा विरोधच करू. राजकारणामध्ये आचारसंहिता पाळली गेली पाहिजे, असे मी मानतो. त्यामुळे अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याचं कुठलंही समर्थन मी करणार नाही, ते चूकच आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः ‘…तर मी आजपासून छोटा पप्पू’, सत्तारांच्या विधानावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया)

दोन्ही बाजूंनी आचारसंहिता पाळण्याची गरज

पण याचबरोबर आचारसंहिता ही दोन्ही बाजूने पाळणं गरजेचं आहे. खोके ओके यांवरुन टीका करणं हे देखील चुकीचं आहे. राजकारणाची पातळी ही अतिशय खाली चालली आहे. राज्याच्या राजकारणाची पातळी कधीही इतकी खालावलेली नव्हती. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते हे आपल्या नेत्यांना समज देत नाहीत तो पर्यंत हे थांबणार नाही, असेही मत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.