मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड)च्या बांधकामांमधील प्रियदर्शनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यानच्या २.०७० किलोमीटर अंतराच्या बोगद्याचे काम जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण केल्यानंतर आता पुन्हा एकदा टीबीएम मावळा दुसऱ्या लढाईसाठी स्वार झाला. गिरगाव ते प्रिय दर्शनी पार्कपर्यंतच्या दुसऱ्या समांतर बोगद्याच्या कामात मावळ्याने १०९ दिवसांमध्ये तब्बल १ हजार मिटरचा भूमिगत पल्ला पार केल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी हे काम ७८ टक्के पूर्ण झाले आहे.
( हेही वाचा : जलवाहिनीभोवतीच्या जमिनींचे टोटल स्टेशन सर्वे आणि सातबाराच्या उताऱ्यासाठी महापालिका मोजणार साडेतीन कोटी रुपये )
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. उजवीकडील बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता डावीकडच्या बाजूने मावळा आता बोगद्याचा मार्ग स्वार झाला असून आतापर्यंत या बोगद्याचे काम ७८ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त(पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
दुस-या बोगद्याचे तब्बल १ हजार मीटरचे खोदकाम २९ जुलै २०२२ रोजी पूर्ण झाले होते. त्यानंतर या बोगद्याचे काम ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी या प्रकल्पाचे काम ७८ टक्के पूर्ण झाले. संपूर्ण प्रकल्पाची तीन पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली असून यापैंकी पॅकेज १ मधील प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस या ३.८२ किलोमीटरचे ६२.२४ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती भिडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दली आहे. तर संपूर्ण प्रकल्पाचे काम ६५ टक्के पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या रस्त्यांमुळे प्रवासाच्या वेळेत ७० टक्के तर इंधनात ३४ टक्के बचत होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सागरी किनारा रस्त्यालगतच्या भराव भूमीमध्ये विविध नागरी सेवा सुविधा विषयक बाबी उभारण्याबाबत न्यायालयाचा निर्णय महापालिकेच्याबाजुने लागला आहे. या निर्णयामुळे ‘सागरी किनारा रस्ता’ (मुंबई कोस्टल रोड) हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास यापूर्वीच महापालिका आयुक्त व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community