इराणमध्ये सध्या सुरू असलेले हिजाब विरोधी आंदोलन पेटत आहे. इराणमधील इस्लामीकरण आणि कट्टरतेच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या मुस्लिम युवतींनी आता मौलवी आणि मुफ्तींच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. धर्मांधतेचा धडा शिकवणाऱ्या मुस्लिम धर्मगुरूंच्या डोक्यावरील पगड्या आणि टोप्या भरचौकात उडवल्या जातात. इराणमध्ये कट्टरपंथी आणि मौलवी यांच्यावर लोकांची नाराजी इतकी वाढली आहे.
महिनाभरापासून हिजाब विरोधी आंदोलन
17 सप्टेंबर रोजी पोलीस कोठडीत 22 वर्षीय मेहसा अमिनी हिचा मृत्यू झाल्यापासून इराणमध्ये हिजाबच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. इराणमध्ये हिजाबपासून मुक्ती मिळावी यासाठी मुस्लिम स्त्रियांनी महिनाभरापासून आंदोलने सुरु केली आहेत. या आंदोलनात आतापर्यंत शेकडो आंदोलकांना ठार मारण्यात आले आहे. या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. इराणमध्ये मुस्लिम युवतींनी हिजाबच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. हिजाब फेकून देत त्यांनी मुस्लिम धर्मातील धर्मनांधतेला आव्हान दिले आहे. हिजाबच्या विरोधात जागोजागी मुस्लिम युवती आंदोलन करत आहेत. हे आंदोलन पोलीस चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतात, मात्र यात शेकडो युवतींचे प्राण गेले आहेत. त्यामुळे आता तेथील युवतींनी इमाम यांच्या डोक्यावरील टोपी उडवून टाकण्याची अनोखे आंदोलन सुरु केले आहे.
(हेही वाचा अखेर ‘इंटरनॅशनल हलाल शो’ रद्द, हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाचा परिणाम)
Join Our WhatsApp Community