केजरीवालांना उघडे पाडणार, सुकेश चंद्रशेखर यांचा इशारा

132

सध्या तुरुंगात असलेले सुकेश चंद्रशेखर यांनी आणखी एक पत्र जारी केले आहे. ईडी आणि सीबीआय त्यांची चौकशी करत असताना त्यांनी आपचे नेते, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सध्या तुरुंगात असलेले मंत्री सत्येंद्र जैन यांना लक्ष्य केले आहे. तुरुंग प्रशासनाच्या सततच्या धमक्यांमुळे मी गप्प बसलो आणि सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले, पण आता आपण घाबरत नाही, केजरीवाल यांना उघड पडणार, असेही चंद्रशेखर म्हणाले.

चंद्रशेखर यांनी पत्रात काय लिहिले?

मी कायद्यानुसार पुढे जाण्याचा निर्णय घेतला. कोणीतरी मला हे करण्यास सांगत आहे म्हणून नाही. केजरीवाल, माजी डीजी संदीप गोयल आणि तुरुंग प्रशासनाविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यास जैन मला सतत का सांगत आहेत. तुमच्या निवडणूक प्रचारासाठी आणखी पैसे द्या, अशी मागणी कारण्यासोयाबीत मला सतत धमक्या का दिल्या जात होत्या? चौकशीला का घाबरता? जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला कशाची भीती वाटते? चंद्रशेखर यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल आणि जैन हे मला चांगले ओळखतात. त्यामुळे मी जे काही बोललो आहे, त्याबाबत मी पुरावे देणार आहे. ते सगळे पुरावे मी देणार आहे. जे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. तुरुंग प्रशासन आणि तुमच्या सहकाऱ्यांकडून मला ऑफर आणि धमक्या पाठवणे बंद करा. मला तुमच्या कोणत्याही धमक्यांची भीती वाटत नाही किंवा त्यात रस नाही. मी मागे हटणार नाही, असेही सुकेश चंद्रशेखर म्हणतात.

(हेही वाचा अखेर ‘इंटरनॅशनल हलाल शो’ रद्द, हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाचा परिणाम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.