मालाड धोंडी कोळीवाड्यातील पाणी समस्या मिटणार

132

मालाड (प), मढ येथील धोंडी कोळीवाडा येथे भूमिपुत्रांना गेल्या दोन वर्षांपासून पाण्याची तीव्र टंचाई सहन करावी लागत आहे. पाण्याचा पुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याने अपुऱ्या पाण्यामुळे स्थानिक कोळी बांधवांना आपल्या दैनंदिन वापरासाठी पाणी लांब जाऊन विकत घ्यावे लागत आहे. परंतु आता ही समस्या दूर होणार असून अदानीने वीजेचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवल्याने टोकावर असलेल्या या कोळीवाड्याला किमान पंपाद्वारे पाण्याचा पुरवठा सुरळीत होणार आहे.

( हेही वाचा : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंधेरीतील फेरीवाल्यांना हटवा; मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना निर्देश)

धोंडी कोळीवाडा शेवटच्या टोकाला असल्यामुळे तेथे तांत्रिक दृष्टिकोनातून पुरेशा दाबाअभावी पाणी पुरवठा होऊ शकत नाही. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून गावकऱ्यांनी स्वखर्चाने पंप रूम बांधले आहेत. जेणेकरून पाणी उच्च दाबाने धोंडी कोळीवाड्यात पोहोचू शकते. पण एवढं सर्व करूनही प्रश्न काही सुटत नव्हता. याकरता वीज पुरवठ्याचीही तेवढीच आवश्यकता असल्याने त्याठिकाणी जागेत केवळ २५ फूट लांबीचा, दोन फूट रुंद व दोन फूट खोल खड्डा केबल टाकण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी यांना खोदणे आवश्यक होते, पण त्याकरता वनविभाग, मुंबई महानगरपालिका आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी या सर्वांची बैठक घेऊन दिवाळीनंतर या समस्येचे निराकरण न झाल्यास तीव्र आंदेालन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा खासदार गोपाळ शेट्टी यांनी याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली.

अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयात अहिरे व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विभागीय वन अधिकारी श्री एम.आदर्श रेड्डी यांच्याशी संपर्क साधून तीन वर्षे जुन्या सरकारी धोरणाच्या माहितीअभावी एक छोटेसे पण महत्त्वाचे काम गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे हे अदानी व वन विभाग अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले आहे की, “महापालिकेचे अधिकारी, अदानी चे अधिकारी बेजवाबदारीने वागतात. विद्युत पुरवठा साठी केबिन तिथेच जागेवरच आहे आणि लाईन आणून पाणी पुरवठा करण्या करिता काही ही अडचण नाही. पण हे अधिकारीवर्ग अजिबात उपाय योजना कडे लक्ष देत नाही. परंतु पुढील आठवड्यात मालाड पश्चिम येथील धोंडी कोळीवाडयात पाणीपुरवठा टंचाई संपणार आहे, हा प्रश्न आता कायमचाच सुटणार असल्याचे भाजपचे मालाड विधानसभा अध्यक्ष सुनील कोळी यांनी स्पष्ट केले. धोंडी कोळीवाड्यात हजार ते बाराशे कुटुंबे राहत असून पाण्याचा पुरवठा येत्या काही दिवसांमध्ये सुरळीत होईल आणि मागील अनेक वर्षांची समस्या दूर होईल असा विश्वास व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.