तब्बल १० लाख शिधापत्रिका होणार रद्द, रेशनपासून राहणार वंचित

157

देशभरात कोट्यवधींच्या संख्येने कुटुंबे रेशनचा लाभ घेतात. परंतु आता देशभरातील शिधापत्रकांची पडताळणी होणार आहे. देशभरातून १० लाख बनावट शिधापत्रिका ओळखल्या आहेत. या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे. ज्यांची शिधापत्रिका बनावट असल्याचे आढळून येईल, त्यांच्याकडून सरकार रेशनची वसुलीही करणार आहे.

कोणाची कार्डे होणार रद्द? 

देशभरातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत रेशन कार्डचा लाभ घेत आहेत. पण ही सुविधा घेण्यास पात्र नसलेले करोडो लोक देशात आहेत. असे असतानाही ते वर्षानुवर्षे मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत आहेत. अलीकडेच सरकारने 10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली आहे. ज्यांना यापुढे गहू, हरभरा आणि तांदूळ मोफत मिळणार आहे. अपात्र शिधापत्रिकाधारकांची यादी शिधावाटप विक्रेत्यांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेशन विक्रेते नावे चिन्हांकित करतील आणि अशा कार्डधारकांचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवतील. त्यानंतर त्यांची रेशनकार्ड रद्द केली जातील. जे लोक मोफत रेशन मिळण्यास पात्र आहेत त्यांनाच रेशन मिळेल. ज्यांची १० एकरपेक्षा जास्त जमीन आहे, आणि ज्यांनी ४ महिन्यांत मोफत रेशन घेतलेले नाही, अशा लोकांची रेशनकार्डे रद्द केली जाणार आहेत.

(हेही वाचा अखेर ‘इंटरनॅशनल हलाल शो’ रद्द, हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाचा परिणाम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.