बुधवारी सकाळी पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कामावर जायच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या तब्बल 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य रेल्वे विस्कळीत,प्रवाशांमध्ये संताप
मध्य रेल्वेच्या कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने येणा-या अनेक लोकल गाड्या या अर्धा तास उशिराने धावत आहेत. जलद मार्गासह धीम्या गतीच्या रेल्वे मार्गावर सुद्धा परिणाम झाला आहे. तसेच काही लोकल रद्द करण्यात आल्यामुळे देखील प्रवाशांमध्ये तारांबळ उडाली आहे. सातत्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होत असल्याने प्रवाशांकडून तीव्र संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे.
(हेही वाचाः UTS App मध्ये रेल्वे करणार ‘हा’ बदल! तिकीट, पास काढताना प्रवाशांना होणार मोठा फायदा)
म्हणून सेवा विस्कळीत
थंडीच्या दिवसांत पडलेल्या धुक्यामुळे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत असल्यामुळे त्याचा फटका लोकल गाड्यांना देखील बसला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पश्चिम रेल्वेवर एसी लोकल धावली उशिराने
बुधवारी पश्चिम रेल्वेवर देखील सकाळच्या सुमारास एसी लोकल उशिराने धावल्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला होता. विरारहून सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी चर्चगेटला जाणारी एसी लोकल तब्बल अर्धा तास उशिराने धावली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. तांत्रिक बिघाडामुळे एसी लोकल सुरू होत नसल्याचे कारण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते.
(हेही वाचाः फक्त 2 रुपये गुंतवा आणि 36 हजार रुपये पेन्शन मिळवा, केंद्र सरकारची भन्नाट योजना)
Join Our WhatsApp Community