भारताच्या आजपर्यंतच्या न्याय क्षेत्राच्या गौरवास्पद वाटचालीत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या कारकिर्दीने आणखी भरच पडेल,’ असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज न्यायमूर्ती चंद्रचूड यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, न्यायमूर्ती चंद्रचूड यांना कुटुंबातूनच विधि व न्याय क्षेत्रातील दीर्घ असा वारसा लाभला आहे. आणखी एक महाराष्ट्र सुपुत्र भारताच्या सर्वोच्च अशा पदावर विराजमान होत आहे, हे निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. ते आपल्या कारकीर्दीत भारताच्या न्यायिक क्षेत्रातील गौरवात आपल्या कामगिरीने भरच घालतील असा विश्वास आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी आदरपूर्वक शुभेच्छा!’
( हेही वाचा: …तर पवार,सुळे,ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकू, शिंदे गटाचा इशारा )
Join Our WhatsApp Communityभारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना आदरपूर्वक शुभेच्छा. भारताच्या आजपर्यंतच्या न्याय क्षेत्राच्या गौरवास्पद वाटचालीत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या कारकिर्दीने आणखी भरच पडेल.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 9, 2022