टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सेमीफायनलपूर्वी सराव सत्रात भारताचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे तो खेळणार की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु आता रोहित शर्माने स्वत: पत्रकार परिषद घेत फिटनेसबाबत अपडेट दिले आहेत.
( हेही वाचा : मोठी बातमी! संजय राऊतांना शंभर दिवसांनी जामीन मंजूर)
रोहित खेळणार की नाही?
इंग्लंडविरूद्ध भारताला चांगली कामगिरी करावी लागेल या नॉकआऊट मॅचचे महत्त्व आम्हाला चांगलेच माहिती आहे. मी आता पूर्णपणे बरा असून मला एकदम ठिक वाटते आहे असे रोहितने पत्रकार परिषदेत सांगितले. रोहितच्या फिटनेसबाबत त्याने स्वत: दिलेल्या माहितीमुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान भारतीय संघाकडे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक असे दोन विकेटकीपर उपलब्ध आहेत, त्यामुळे यापैकी कोणाची करायची याचा निर्णय गुरूवारी घेतला जाणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्माने अक्षर पटेलच्या गोलंदाजीबद्दल सुद्धा सांगितले. त्याची कामगिरी हा काळजीचा विषय आहे असे त्याने नमूद केले.
मार्क वूड दुखापतग्रस्त
इंग्लंडचा स्टार फलंदाज डेव्हिड मलान (david malan) आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. मार्क वूड सराव सत्रात सुद्धा सहभागी झाला नव्हता. त्यामुळे गुरूवारी त्याच्या खेळण्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मार्क वूड हा 154.74kph वेगाने चेंडू टाकणारा विश्वचषकातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
Join Our WhatsApp Community