देशातील कोणता पूल कोसळणार, आधीच वाजणार अलार्म; काय आहे गडकरींचा मेगाप्लॅन?

134

गुजरातच्या मोरबीमध्ये नुकताच केबल पूल कोसळून १३५ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पुलाच्या दुरुस्ती आणि सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पूल कोसळण्यापूर्वी कळेल अशी यंत्रणा आपल्या देशात आहे का? गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि विरोधक मोरबी दुर्घटनेवर जोरदार आवाज उठवत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मेगाप्लॅनची ​​माहिती दिली आहे.

(हेही वाचा – राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, जामिनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार)

काय म्हणाले गडकरी

या मेगाप्लॅनविषयी बोलताना ते म्हणाले. आता मी ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये जाऊन अभ्यास केला आहे. यासह नाशिकमधील आमच्या काही कर्मचाऱ्यांनी एक संशोधन केले आहे. यामध्ये देशातील सर्व पूल एका अशा यंत्रणेने जोडले जाणार आहेत. यामुळे दिल्लीत ठेवलेल्या आमच्या कंप्यूटरवर देशातील कोणता पूल कोसळणार आहे? कोणता पूल कमकुवत आहे? याचे आधीच अलार्म मिळू शकणार आहे. पुढे गडकरी असेही म्हणाले २०२४ पूर्वी भारतातील सर्व रस्ते अमेरिकेच्या बरोबरीने बनवू असे वचन आम्ही दिले असून आमचा आमच्या कामावर विश्वास असल्याचे ते म्हणाले.

80 हजार पुलांचे रेकॉर्ड पूर्ण

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणाले, देशातील 80 हजार पुलांचा रेकॉर्ड एकत्र केला आहे. याशिवाय 3 ते 4 लाख पुलांचा डेटा करणे बाकी आहे. नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या या सिस्टिममुळे कमकुवत किंवा कोसळणारा पूल आढळल्यास दिल्लीत ठेवलेल्या कंप्यूटरवर अलार्म वाजेल त्यानंतर याबाबत राज्य सरकार आणि कॉर्पोरेशनला पूल सदोष असल्याची माहिती दिली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.