ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क फुल फॉर्ममध्ये आहेत. मस्कच्या आठ डॉलरच्या निर्णयाला जगातील मोठे तज्ज्ञही विरोध करत आहेत, पण एलॉन मस्क वारंवार सांगताय काहीही करा, आठ डॉलर्स द्यावेच लागतील. आता एक नवीन अहवाल असा दावा करत आहे की, एलॉन मस्क सर्व ट्विटर यूजर्सकडून पैसे आकारणार आहे. त्यामुळे ब्लू टिकच नाही तर सर्व ट्विटर युजर्सनाही ते वापरताना पैसे मोजावे लागणार आहेत.
असा दावा केला जात आहे की, एलॉन मस्क सर्व ट्विटर युजर्सना ट्विटर वापरण्यासाठी चार्ज करण्याची योजना आखत आहे. सर्व ट्विटर यूजर्सला ट्विटर ब्लू सेवा घ्यावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. थोडक्यात ब्लू टिकचे युजर्स तुम्ही असा किंवा नसा, तुम्ही ट्विटरचा वापर करता म्हणजे, तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे. याकरताच मस्क हे एक प्लॅन तयार करत असल्याचे सांगितले जात आहे. तर अलीकडेच एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसोबत यासंदर्भात बैठकही घेतली होती.
(हेही वाचा – Meta Layoffs: FB, इंस्टा, व्हॉट्सअॅपमध्ये कर्मचारी कपात सुरू; नोकरी गेलेल्यांना मिळणार इतका पगार)
सुरुवातीला, तुम्ही काही दिवसांसाठी ट्विटर विनामूल्य वापरण्यास सक्षम असाल, परंतु एका महिन्यानंतर तुम्हाला ट्विटरची सशुल्क सेवा Twitter Blue चे सदस्यत्व घ्यावे लागेल. असे म्हटले जात आहे की, एलॉन मस्क लवकरच एक नवीन व्हेरिफिकेशन फीचर आणणार आहे.
Join Our WhatsApp Community