G-20 शिखर परिषद म्हणजेच ग्रुप -20 ची अध्यक्षता 1 डिसेंबरला भारताला मिळणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये देशाची राजधानी दिल्लीमध्ये जगातील सर्वात मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी G- 20 चा लोगो, थीम आणि वेबसाईट लाॅन्च केली.
भारतात होणा-या जी-20 परिषदेसाठी लाॅन्च केलेल्या लोगोमध्ये ट्वेंन्टीमधील शून्याला पृथ्वीच्या रुपात दाखवण्यात आले आहे तर या लोगोचे थीम आहे वसुधैव कुटुंबकम्…म्हणजेच संपूर्ण पृथ्वी हेच आमचे कुटुंब आहे असा त्याचा अर्थ होतो. इंग्रजीमध्ये या जी-20 लोगोसाठी वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर ही टॅग लाईन देण्यात आली आहे.
असा आहे G-20 चा लोगो
या लोगोमध्ये चार रंगांचा वापर करण्यात आला आहे आणि हे चार रंग आहेत केशरी, हिरवा, पांढरा आणि निळा. हे चारही रंग भारताच्या राष्ट्रीय ध्वजातून घेण्यात आले आहेत. याशिवाय या लोगोमध्ये कमळाच्या फुलाच्या ज्या सात पाकळ्या दाखवण्यात आल्या आहेत, त्या पृथ्वीवरील सात महासागर आणि महाद्वीपांचे प्रतिनिधित्व करत आहेत.
( हेही वाचा: अंदमानातील सावरकर कोठडीतील इतिहास खरवडून काढला, कोण आहे दोषी? )
काय आहे G-20 ?
जी-20 हा जगातील सर्वात मोठा शक्तीशाली समूह आहे. याची स्थापना 1999 मध्ये या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली होती. मात्र 2008 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीनंतर या जागितिक समुहाचे नेतृत्व अर्थमंत्र्यांकडून समुह देशांच्या प्रमुखांकडे सोपवण्यात आले. हा समुह जगातील 85 टक्के अर्थव्यवस्था आणि 75 टक्के व्यापारावर नियंत्रण ठेवतो. अमेरिका, कॅनडा, ब्रिटेन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, चीन, भारत रशिया यांसारख्या महत्वाच्या देशांचे प्रमुख दरवर्षी जी-20 परिषदेच्या निमीत्ताने भेटत असतात.
Join Our WhatsApp Community