मुंबई वडाळा, माटुंगा,(एफ/उत्तर), वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व परिसर (एच/पूर्व), कुर्ला विभाग (एल), गोवंडी (एम/पूर्व) तसेच मालाड( पी/उत्तर) या विभागात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये गोवर / रुबेला आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून येत आहे. एका बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्या अनुषंगाने या विभागांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर, रुबेलाच्या संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित रुग्णांचे रक्ताचे तसेच लघवीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहे. सर्वेक्षणातील एकूण गोवर रुग्णांच्या संख्येपैकी सुमारे १० टक्के बालके ही अर्धवट लसीकरण झालेली व २५ टक्के बालके लसीकरण न झालेली आढळून आली आहेत. त्यामुळे एकप्रकारे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या विभागांमध्ये अतिरिक्त लसीकरणाची सत्रे आयोजित करण्यात येत आहेत.
( हेही वाचा : जामीन मिळाला, क्लीनचिट नाही, भाजपचा संजय राऊतांना गर्भीत इशारा )
गोवर व रुबेला या आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरणाची पहिली मात्रा बालकास ९ महिने पूर्ण झाल्यावर व दुसरी मात्रा १६ महिने पूर्ण झाल्यावर देणे गरजेचे असते. या दोन्ही मात्रा मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र, दवाखाने, सर्वसामान्य रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये येथे मोफत उपलब्ध आहेत. सबब, सर्व पालकांनी आपल्या ९ महिन्यांच्या व १६ महिन्यांचे बालकांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
मुंबईत नियमितपणे लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येतो. या लसीकरण कार्यक्रमात ० ते २ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ, कावीळ, क्षयरोग, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, गोवर, रुबेला, गालगुंड व रोटा व्हायरस-डायरिया, न्युमोनिया यासारख्या आजारांपासून व गर्भवती महिलांचे लसीकरण करुन नवजात बालकांना धनुर्वात आजारापासून संरक्षित करण्यात येते. या नियमित लसीकरण व पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमुळे सन २०१४ पासून भारत पोलिओमुक्त झाला आहे. तसेच नवजात बालकांमध्ये धनुर्वात आजाराचे निर्मूलन झाले आहे. त्याचप्रमाणे, गोवर, रुबेला या आजाराचे डिसेंबर २०२३ पर्यंत निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवून त्यादिशेने वाटचाल सुरु आहे.
मागील काही आठवड्यात मुंबईतील एफ/उत्तर विभाग, एच/पूर्व विभाग, एल विभाग, एम/पूर्व विभाग तसेच पी/उत्तर विभागात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये गोवर / रुबेला आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले आहे. तसेच एका बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्या अनुषंगाने या विभागांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर, रुबेलाच्या संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित रुग्णांचे रक्ताचे तसेच लघवीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहे. सर्वेक्षणातील एकूण गोवर रुग्णांच्या संख्येपैकी सुमारे १० टक्के बालके ही अर्धवट लसीकरण झालेली व २५ टक्के बालके लसीकरण न झालेली आढळून आली आहेत.
गोवर या आजारामध्ये बालकास ताप येऊन त्याला सर्दी, खोकला व अंगावर लालसर पूरळ येते. अर्धवट व लसीकरण न झालेल्या बालकांमध्ये या आजारामुळे पुढे होणारी गुंतागुंत गंभीर स्वरुपाची होऊ शकते. उदा. फुफ्फुस दाह (Bronchopneumonia), अतिसार (Diarrhoea), मेंदुचा संसर्ग (Encephalitis) तसेच गर्भवती स्त्रीला रुबेलाचा संसर्ग झाल्यास गर्भातील बाळामध्ये विकृती निर्माण होऊ शकते. पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांमध्ये अशा प्रकारची गुंतागुंत होण्याची शक्यता नसते.
महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारच्या रुग्णांची संख्या इतरत्र वाढल्याचे आढळून आले आहे. यास्तव, मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे मुंबईकर नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, गोवर व रुबेला या आजाराची पहिली मात्रा बालकास ९ महिने पूर्ण झाल्यावर व दुसरी मात्रा १६ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात यावी. या दोन्ही मात्रा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र, दवाखाने, सर्वसामान्य रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये येथे मोफत उपलब्ध आहेत. तसेच या विभागांमध्ये अतिरिक्त लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घेऊन बालकाचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करावे व आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community