मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसवरील पिट लाइन क्रमांक 6 च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबरपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सुटणा-या आणि बाहेरुन लोकमान्य टिळक स्थानकावर येणा-या कोकण रेल्वेच्या गाड्यांना नो एंट्री असेल. या काळात संबंधित मार्गावर धावणा-या गाड्यांना पनवेल स्थानकाचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
मध्य रेल्वेने 8 ते 12 नोव्हेंबर या दरम्यान लोकमान्य टिळक स्थानकांत अपग्रेडेशनचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या कालावधीत लोकमान्य टिळक स्थानकातून सुटणा-या आणि स्थानकात येणा-या कोकण रेल्वेच्या गाड्या पनवेल स्थानकात थांबणार आहेत. तिरुवनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही नेत्रावती एक्सप्रेस 11 नोव्हेंबरपर्यंत पनवेल स्थानकात थांबणार आहे. त्याचप्रमाणे मंगळुरु सेंट्रल ते लोकमान्य टिळक ही मत्स्यगंधा एक्स्प्रेसही पनवेल स्थानकातच थांबेल, असे कोकण रेल्वेने कळवले आहे.
( हेही वाचा: बारावी पास आहात? रेल्वे पोलीस विभागात नोकरीची संधी; परीक्षेविना केली जाणार निवड )
पनवेल स्थानकातून सुटणा-या गाड्या
- लोकमान्य टिळक ते मंगळुरु सेंट्रल ही मत्स्यगंधा एक्स्प्रेस 9 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत पनवेल स्थानकातून सायंकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी सुटणार आहे.
- गाडी क्रमांक 16345 ही लोकमान्य टिळक ते तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस 10 ते 13 नोव्हेंबर या काळात दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी पनवेल स्थानकावरुन सुटेल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.