फेसबुकच्या 11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ; मार्क झुकरबर्गने मागितली माफी

157

फेसबूक, व्हाॅट्सअॅपची कंपनी मेटाने जगभरातील तब्बल 11 हजार कर्मचारी कमी करण्याची घोषणा बुधवारी केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. झुकरबर्ग यांनी सर्व कर्मचा-यांना पत्र पाठवले असून, घटलेला महसूल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या समस्या हे यामागील कारण असल्याचे सांगितले आहे. झुकरबर्ग यांनी या निर्णयाची जबाबदारी घेतली आहे.

आम्ही सध्या जिथपर्यंत पोहोचलो आहोत त्याची आणि या निर्णयाची जबाबदारी मी घेत आहे, असे झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर मेटा कर्मचा-यांसाठी पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे सर्वांसाठी फारच कठीण असल्याची मला जाणीव आहे. ज्यांना याचा फटका बसला आहे त्यांची मी माफी मागतो, असे झुकरबर्ग यांनी सांगितले आहे.

मार्क झुकरबर्ग यांचे कर्मचा-यांना पत्र 

कोरोनाची साथ संपल्यानंतरही उत्पन्न वाढ कायम राहील, हे गृहीत धरुन आक्रमकपणे नोकरभरती केली. मात्र दुर्दैवाने माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत, असे झुकरबर्ग यांनी कर्मचा-यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मेटाने सलग दोन तिमाहींमध्ये महसुलात मोठी घट नोंदवली आहे. कंपनीने मेटाव्हर्स या नव्या संकल्पनेत तब्बल 10 अब्ज डाॅलरची गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. याचाही परिणाम कंपनीच्या महसूल आणि उत्पन्नावर झाला आहे. याखेरीज अॅपलच्या खासगीकरण साधनांमुळे फेसबूक, इन्टाग्राम, स्नॅप यांना वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. याचाही फटका मेटा कंपनीला बसतो आहे. तरुणांमध्ये टिकटाॅक अधिक लोकप्रिय होत असून, त्याची फेसबुकला तीव्र स्पर्धा आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.