रेल्वे सेवेत अग्रणीय असलेल्या पश्चिम रेल्वेला रेल्वे मंत्रालय दुजाभाव वागणूक देत होते. मागील 9 महिन्यापासून पश्चिम रेल्वेला महाव्यवस्थापक नसल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी करताच रेल्वे मंत्रालयाला जाग आली. या तक्रारीनंतर अशोक कुमार मिश्रा हे नवीन महाव्यवस्थापक पश्चिम रेल्वेला मिळाले आहेत.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापक बाबत विविध माहिती विचारली होती. पश्चिम रेल्वेच्या उप मुख्य कर्मचारी अधिकारी रामप्रसाद बी यांनी अनिल गलगली यांस कळविले की, 1 फेब्रुवारी 2022 पासून पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक पद रिक्त आहे. सद्या प्रकाश बुटानी जे अप्पर महाव्यवस्थापक आहेत त्यांस प्रभार देण्यात आला आहे. या नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकरण रेल्वे बोर्ड असून सक्षम प्राधिकारी यांच्या नावाची माहिती रेल्वे बोर्डाकडून घेण्याचा सल्ला देण्यात आला.
(हेही वाचा – तुरुंगातून बाहेर येताच राऊत मोदी, शहा, फडणवीस आणि पवारांना भेटणार; कारणही सांगितले)
अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री आणि प्रशासनास पत्र पाठवून हे रिक्त पद तत्काळ भरण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून 9 महिन्यानंतर पश्चिम रेल्वेला महाव्यवस्थापक मिळाले आहेत.
Join Our WhatsApp Community