‘इथे’ मजुरांसाठीही येते आलिशान कार

141

एक काळ असा होता की, केवळ एखाद्या साहेबाला ने-आण करण्यासाठी मोटारगाडी असायची. पण, काळ बदलला असून, शेतामध्ये शेतमजुरांची कमतरता भासू लागल्याने मजुरांना कामावर ने-आण करण्यासाठी बागायतदार आलिशान कार घेऊन मजुरांच्या दारात जात असल्याचे आता दिसते आहे. मजुरांच्या गरजेनुसार, त्यांना महत्त्व आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली असून, शेतात गेले की पिण्याच्या पाण्यासाठी जार आणि दोन वेळा गरमागरम चहाही दिला जात आहे.

( हेही वाचा: T20 World Cup : कोहलीची ‘विराट’ कामगिरी! टी-२० विश्वचषक स्पर्धेत नवा विक्रम )

…म्हणून सकाळीच कार दारासमोर उभी राहते

अहमदनगर जिल्ह्यातील कुकडी, घोड, भीमा, सीनेच्या पाण्यामुळे ऊस फळबागांमध्ये वाढ झाली आहे. युवा वर्ग शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराकडे झुकला. तशीच शेतात काम करणा-या मजुरांची टंचाई निर्माण झाली. द्राक्षे व डाळिंब भागातील कामे अतिशय कसरतीची असल्याने, ही कामे परप्रांतीय मजूर धोका पत्करुन करतात. त्यांना श्रमाचा मोबदलाही त्या प्रमाणात मिळतो. सध्या अशा मजुरांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. बागायतदार मंडळींना मजुरांना शेतात कामाला आणण्यासाठी आपली आलिशान कार घेऊन मजुरांकडे जावे लागते. कार नसेल तर मजूर दुसरीकडे कामाला जातात. त्यामुळे मजुरांच्या दारी अगदी सकाळीच कार येतात. संध्याकाळी पुन्हा वेळेत घरी आणून सोडतात. त्यामुळे मजुरांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.