चीनमध्ये वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी द्याव्या लागणा-या चाचणीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, चीनमध्ये ही चाचणी किती कठीण आहे, हे या व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येत आहे. या चाचणीची काठिन्य पातळी बघून समाजमाध्यमांवरील वापरकर्ते अचंबित झाले आहेत.
चीनमधील तानसू येगेन नावाच्या एका चिनी तरुणाने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
( हेही वाचा: मुंबई लोकल का धावत आहेत विलंबाने? हे आहे कारण… )
Driver license exam station in China pic.twitter.com/BktCFOY4rH
— Tansu YEĞEN (@TansuYegen) November 4, 2022
प्रचंड कठीण टेस्ट
- ड्रायव्हिंग टेस्टिंगसाठी जो रस्ता बनवला आहे. त्याच्या दोन्ही बाजूंनी पांढच्या रंगाच्या पट्ट्या लावलेल्या आहेत. या रस्त्यांची रुंदी फारच कमी आहे. काही ठिकाणी तो सरळ तर काही ठिकाणी वाकडा-तिकडा आहे.
- त्यात मध्येच अनेक अडथळे आहेत. पार्किंगपासून ते 8 बनवण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. पांढ-या रेषेला गाडीने स्पर्श केल्यास चालक चाचणीत नापास होतो.