वाढत्या प्रदूषणामुळे सध्या वाहनांच्या पीयूसी प्रमाणपत्राची चांगलीच चर्चा सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी देखील याबाबत कारवाई सुरू केली असून ज्या वाहनांची प्रदूषण तपासणी कऱण्यात आली नाही, त्यावर चलन किंवा जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. अशातच पीयूसी प्रमाणपत्र जर नसेल तर वाहनाच्या विम्याचा दावा मिळू शकत नाही, अशी चर्चाही सुरू आहे. मात्र हे किती सत्य आहे. त्याचे काही नियम आहे का…जाणून घ्या
वैध पीयूसी प्रमाणपत्र असेल तरच विमा काढता येणार
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, भारत सरकारच्या १९८९ च्या केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत सर्व वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने विमा कंपन्यांना वैध पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहनांचा विमा काढू नये, असे सांगितले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या अधिसूचनेनुसार, वाहन मालकांना विम्याचे नूतनीकरण करताना वैध पीयूसी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. तर सर्वोच्च न्यायालयाच्या मते, विमा कंपन्या वैध पीयूसी प्रमाणपत्र असेल तरच वाहनांचा विमा काढता येणार आहे.
(हेही वाचा – साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! साई संस्थानने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय -)
काय आहेत क्लेमसंदर्भात नियम?
विमा पॉलिसी मिळविण्यासाठी वैध पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु क्लेमसाठी ते आवश्यक नाही. कारण क्लेमबाबतचे नियम वेगळे आहेत. प्रतिष्ठित विमा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मते , क्लेमदरम्यान तुमच्या वाहनाकडे पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर तुमचा क्लेम नाकारला जाणार नाही. नोव्हेंबरमध्ये विमा क्लेमची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नव्याने सादर केलेल्या KYC नियमांचा पीयूसी प्रमाणपत्राशी काहीही संबंध नाही.
Join Our WhatsApp Community