मध्य रेल्वेवर १९ आणि २० नोव्हेंबरला तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर स्थानकाजवळील कार्नाक बंदर पूल पाडण्याच्या कामासाठी हा विशेष ट्रॉफिक ब्लॉक असणार आहे. परिणामी मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. कोकण रेल्वेच्या सुद्धा काही गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. हा बदल १९ आणि २० नोव्हेंबर या दोनच दिवसांसाठी आहे, असे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
( हेही वाचा : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ‘२७ तासांचा’ मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलले)
कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक…
या बदलांनुसार मडगाव-मुंबई (क्र. 12052) जनशताब्दी एक्स्प्रेस तेजस एक्स्प्रेस, (क्र. 22120) मांडवी एक्स्प्रेस या गाड्या दोन्ही दिवशी दादरपर्यंतच धावतील. मांडवी एक्स्प्रेस (क्र. 10104), कोकणकन्या एक्स्प्रेस (क्र. 10112) मंगलुरू-मुंबई एक्स्प्रेस (क्र. 12134) या गाड्या पनवेलपर्यंतच धावतील.
जनशताब्दी एक्स्प्रेस (क्र. 12051) आणि तेजस एक्स्प्रेस (क्र. 22119) या दोन्ही गाड्या रविवारी २० नोव्हेंबरला दादर येथूनच सुटतील.
मांडवी एक्स्प्रेस (गाडी क्र. 10103) आणि मुंबई-मंगलुरू एक्स्प्रेस (क्र. 12133) या दोन्ही गाड्या रविवारी (दि. २० नोव्हेंबर) पनवेल येथून सुटतील, तर कोकणकन्या एक्स्प्रेस (क्र. 10111) १९ आणि २० नोव्हेंबर रोजी पनवेल येथूनच सुटणार आहे.
Join Our WhatsApp Community