मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील सर्वात मोठा घाट ठरलेल्या कशेडी घाटातील बोगद्यांचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून, आता आतील काॅंक्रीट रस्त्याचे काम बाकी आहे. एकूण 9 किलोमीटरच्या लांबीत 2 किलोमीटरचे समांतर दोन बोगदे वाहतुकीस सुरु करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आले आहे. या बोगद्यामुळे सध्याचा पाऊण तासाचा घाट पार करण्यासाठी अवघी दोन मिनिटेच लागणार आहेत.
( हेही वाचा: पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला डीवचण्यासाठी ट्विट केलं, अन् तेही दुसऱ्याचं चोरून? )
वेळेत कमालीची बचत
- कशेडी घाटातील 13 किलोमीटर अंतरात अनेक अवघड वळणे आहेत. त्यामुळे खेड ते पोलादपूरच्या दरम्यान तासाभराचा कालावधी लागतो. मात्र, आता या बोगद्यामुळे 4 किलोमीटरचे अंतर वाचणार असून, वेळेची बचतही होणार आहे. अवघ्या दोन ते चार मिनिटात आता बोगदा पार करणे शक्य होणार आहे.
- कशेडी घाटात ब्लॅक स्पाॅट ठरलेल्या वळणावर वर्षातून सात ते आठ अपघात होतात. पावसाळ्यात दरडी कोसळून महामार्ग बंद राहतो. घाटाच्या चढ आणि उतारात तासाभराचा कालावधी जातो.