भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या सर्व सहा सहा आरोपींना मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या दोषींवर जर इतर कोणतेही खटले नसतील तर त्यांची सुटका करण्यात यावी, असेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात दिले आहेत.
सात जण दोषी
तामिळनाडूतील पेराम्बदूर येथे प्रचारसभेदरम्यान 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी म्हणून पेरारिवलन याच्यासह अन्य सहा जणांना दोषी ठरवण्यात आले होते. मुख्य आरोपी पेरारिवलन याला टाडा न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.
(हेही वाचाः राजीव गांधींच्या मारेक-याची होणार सुटका: सर्वोच्च न्यायालयाचे आदेश)
पेरारिवलनची सुटका
मात्र, पेरारिवलन याच्या दयेच्या याचिकेवरील निर्णयासला उशीर झाल्याचा दाखला देत पेरारिवलनची फाशीची शिक्षा न्यायालयाने जन्मठेपेत रुपांतरित केली होती. दरम्यान, चांगल्या वर्तणुकीसाठी पेरारिवलन याला 18 मे 2022 रोजी मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
पण आता या प्रकरणातील अन्य सहा आरोपी नलिनी,रविचंद्रन,मुरुगन,संथन,जयकुमार आणि रॉबर्ट पायस यांनाही मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Join Our WhatsApp Community