शिंदे गटाला धक्का, मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातील नगरसेविकेचा ठाकरे गटात प्रवेश

117

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या उठावानंतर शिंदे गटात ठाकरे गटातील आजी-माजी नेत्यांचं जोरदार इनकमिंग सुरू होतं. पण आता मुख्यमंत्री शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाण्याच्या माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश

ठाण्यातील शिंदे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी आणि भास्कर शेट्टी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला आहे. ठाकरे गटात झालेल्या या घरवापसीमुळे महापालिका निवडणुकांच्या आधीच शिंदे गटाला खिंडार पडायला सुरुवात झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

(हेही वाचाः राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी ‘या’ कारणामुळे अपूर्ण, पुढील सुनावणी केव्हा?)

शिंदे गटाचाही ठाकरेंना धक्का

नुकत्याच ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका ज्योती माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला होता. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट एकमेकांचे नेते फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. यासाठी मोठी स्पर्धा रंगली असून दोन्ही गटाचे दिग्गज नेते आपल्या कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.