तुमच्याकडे ATM Card आहे? तर तुम्हाला मिळणार 5 लाख; बॅंकेची ही सुविधा माहितीय का?

176

ATM Card ही काळाची गरज बनली आहे. एटीएम कार्डचा वापर करुन ऑनलाइन पेमेंटही करता येते. तुम्हीही एटीएम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. एटीएम कार्ड वापरणा-या ग्राहकांना 5 लाख रुपये दिले जातील असे बॅंकेने सांगितले आहे. बॅंकेच्या या सुविधेबद्दल जाणून घेऊया.

काय आहे बॅंकेची सुविधा

सध्या देशातील बहुतांश ग्राहक एटीएम कार्ड वापरतात. तर अशा परिस्थितीत 5 लाखांचा फायदा कसा घ्यायचा? ते असे की, बॅंकेच्यावतीने एटीएम वापरकर्त्यांना विम्याची सुविधा दिली जाते. ATM Card असलेल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जातात. विमा हादेखील यापैकी एक आहे. बॅंकेने ग्राहकाला एटीएम कार्ड देताच, ग्राहकाला अपघाती विम्याची सुविधा मिळते.  यासाठी कार्डहोल़्डरच्या कुटुंबियांनी अर्ज करणे आवश्यक असते.

कोणाला मिळतो Insurance?

RBI च्या नियमांनुसार, कोणत्याही सरकारी किंवा खासगी बॅंकेच्या एटीएम धारकांना Insurance मिळतो. पण ग्राहकाने एटीएम कार्ड किमान 45 दिवसांपूर्वी वापरत असणे आवश्यक आहे. म्हणजेच एटीएम कार्ड हाती मिळाल्यानंतर 45 दिवसानंतर अपघात झाल्यास Insuranceसाठी क्लेम करु शकतो. एटीएमच्या Insurance वर किती रक्कम मिळेल, हे सर्व एटीएम कार्डच्या श्रेणीवर अवलंबून आहे.

( हेही वाचा: ‘आधार कार्ड’ संंबंधी सरकारने केला ‘हा’ नवा नियम )

मृत्यूनंतरही मिळतात पैसे

एटीएम कार्ड वापरणा-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत Insurance उपलब्ध आहे. दुसरीकडे, जर एका हाताला किंवा एका पायाला इजा झाली असेल, तर त्या प्रकरणात 50 हजार रुपयांपर्यंतची विम्याची रक्कम उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला बॅंकेकडे अर्ज करावा लागेल. कार्डधारकाच्या नाॅमिनीला अर्ज बॅंकेत जमा करावा लागतो.

कार्डनुसार पैसे उपलब्ध

  • प्रधानमंत्री जन धन खात्यावर रुपे कार्ड उपलब्ध- 1 ते 2 लाख रुपयांचा विमा
  • सामान्य मास्टरकार्ड- 50 हजार रुपयांचा विमा
  • क्लासिक कार्ड- 1 लाख रुपयांचा विमा
  • व्हिसा कार्ड- 1.5 ते 2 लाख रुपयांचा विमा
  • प्लॅटिनम कार्ड- 2 लाख
  • प्लॅटिनम मास्टरकार्ड- 5 लाख रुपयांचा विमा

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.