सेवा विवेकचे संचालक दिलीप करंबेळकर व सेवा विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी लूकेश बंड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची संघ मुख्यालय, डॉ. हेडगेवार भवन, महल,नागपूर येथे भेट घेतली.
( हेही वाचा : ६० मिनिटांत ६१ महिलांना ब्रायडल मेकअप; पुण्यातील महिलेला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान!)
त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांना संस्थेच्या कार्याची माहिती लूकेश बंड यांनी दिली. सरसंघचालकांनी सर्व माहिती समजून घेतल्यावर संस्थेच्या महिला सक्षमीकरणाचे विशेष कौतुक केले. यावेळी दिलीप करंबेळकर व लूकेश बंड यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सेवा विवेक संस्थेचे माहितीपत्रक व आदिवासी महिलांनी बांबु हस्तकलेद्वारे तयार केलेल्या वस्तू भेट दिल्या. या वस्तू सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रचंड आवडल्या. त्यांनी आदिवासी महिलांच्या कलेचे कौतुक केले.
सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने सेवा विवेकने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते. पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडोहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबू पासून उत्तम दर्जेदार प्रयावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे. उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे.
यावर्षी महिलांनी बनवलेल्या राखी व कंदीलांना विदेशातही मागणी होती. तसेच वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर ,मोबाईल होल्डर , पात्राधर , फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार करतात.
या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घरची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहे.
गेल्या वर्षी सेवा विवेकच्या कार्याचा माजी राष्ट्रपती व राज्यपाल यांनी कौतुक केले होते. माजी राष्ट्रपतींनी हस्तकला प्रशिक्षित आदिवासी महिलांचा सत्कार केला. आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला ह्या संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत तसेच नवीन महिलांना त्या प्रशिक्षण देत आहेत. यामुळेच आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.
Join Our WhatsApp Community