तुम्हाला एटीएम कार्डसारखे आधार कार्ड हवे आहे का… तर आता तुम्ही घर बसल्या एटीएम कार्डासारखे PVC आधार कार्ड सहज बनवू शकणार आहात. आधार कार्ड हे देशातील सामान्य नागरिकांपासून मोठ्या माणसांपर्यंत अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे हे बंधनकारक आहे.
आतापर्यंत आधारकार्ड हे कागदावर छापील स्वरूपात मिळत होते. परंतु आता तुम्हाला पीव्हीसी कार्डच्या स्वरूपात आधार कार्ड मिळू शकणार आहे. हे पीव्हीसी आधारकार्ड देखरेख करणे किंवा सोबत बाळगणे अगदी सोपे होते. जे तुम्ही एटीएम कार्डप्रमाणे तुमच्या वॉलेटमध्ये ठेवून सहज हाताळू शकतात. जाणून घ्या, घरबसल्या PVC आधार कार्ड तुम्ही कसे तयार करू शकता.
(हेही वाचा – ‘मायदेशी परत या’ म्हणत, ट्विटर-मेटामधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना ‘हा’ भारतीय CEO देणार नोकरी!)
#UpdateMobileInAadhaar You can order your #AadhaarPVCcard online from https://t.co/zEhSmIKdme and receive the SMS with your SRN and AWB numbers. Please note that it can be ordered using any mobile number, even if it is not linked with your Aadhaar. #AadhaarPVC pic.twitter.com/cKmMzt05iw
— Aadhaar Office Hyderabad (@UIDAIHyderabad) December 25, 2021
- सर्वप्रथम तुम्हाला UIDAI या वेबसाइट uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in वर भेट द्यावे लागेल.
- या संकेतस्थळावर तुम्ही गेल्यानंतर तुम्ही तुमचे पीव्हीसी आधार कार्डसाठी मागणी करू शकतात. या संकेतस्थळावर तुम्हाला पीव्हीसी आधारकार्ड असा पर्याय दिसेल
- यानंतर वेबसाइटवर, तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक, व्हर्च्युअल आयडी क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक नोंद करावा लागेल
- पीव्हीसी आधारकार्ड ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला नाममात्र 50 रुपये इतके सामान्य शुल्क भरावे लागेल.
- यानंतर या संपूर्ण अर्ज प्रक्रियेनंतर पीव्हीसी आधारकार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर घरपोहोच मिळेल.