महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ मधून ६२३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२२ आहे.
( हेही वाचा : UTS ॲपद्वारे ५ किलोमीटर अंतरावरून काढता येणार लोकलचे तिकीट; जाणून घ्या नवे नियम)
परीक्षेचे नाव – राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२
- पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/संशोधन अधिकारी
- पदसंख्या – ६२३ जागा
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क – अमागास ५४४ रुपये, मागासवर्गीय ३४४ रुपये
- वयोमर्यादा – १८ वर्षे पूर्ण, खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे, मागासवर्गीय/अनाथ – ४३ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १४ नोव्हेंबर २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०२२
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
- वेतनश्रेणी – आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी, गट-ब संवर्गातील वेतनश्रेणी ४१ हजार ८०० ते १ लाख ३२ हजार ३०० रुपये