प्रतापगडच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी कोणाच्या हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आणखी तीन कबरी असल्याच्या वृत्ताला साता-याच्या जिल्हाधिका-यांनी देखील दुजोरी दिला आहे. सध्या या कबरी नक्की कोणाच्या याबाबत माहिती काढण्याचे काम महसूल विभागाकडून केले जात आहे.
प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम प्रतापगडावरुन हटवण्यात आले आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाची कारवाई करण्यात आली. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात आली.
( हेही वाचा: दिवसभर फिरा केवळ 40 रुपयांत; पुणेकरांची लाईफलाईन PMPML ची योजना )
2006 सालापासून हा परिसर सील
हिंदुत्ववादी संघटनांनी अफझल खानाच्या कबरीजवळ असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी केली होती. तसेच, शिवप्रेमींकडून वारंवार मागणी होत असल्याने, अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. त्या परिसरात कोणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.