भविष्याचा विचार करून नागरिक विविध बॅंकेच्या योजना, म्युचुअल फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्हीसुद्धा बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर भारतीय पोस्ट खात्याच्या विविध बचत योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे सरकारी योजनेत गुंतवणूक करणे सर्वात जास्त सुरक्षित असते. भारतीय टपाल विभागाने तुमच्यासाठी कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट खात्याच्या योजना सर्वसामन्यांपर्यंत पोहोचवून त्या माध्यमातून कमाई करण्याची ही नवी योजना आहे. त्यासाठी केवळ ५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर यातून फायदा मिळवता येणार आहे.
( हेही वाचा : पोस्टाची नवी सुविधा! घरबसल्या काही मिनिटांत चेक करता येईल बॅलन्स )
पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी
पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी घेऊन आपण व्यवसाय करू शकतो, या व्यवसायासाठी फार मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. फक्त या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला ५ हजार रुपये गुंतवावे लागतील. पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात पोस्ट कार्यालयांचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत सहभागी होऊ शकता. तुम्ही पोस्ट खात्याची फ्रेंचायझी घेऊन त्या माध्यामातून कमाई करू शकता असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
विविध योजनांची माहिती पोहोचवा; कमिशन आधारे पैसे कमवा
प्रत्येक ग्रामीण क्षेत्रात ही सेवा पुरविण्यासाठी आणि नागरिकांना पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी पोस्ट खात्याकडून फ्रेंचायझी देण्यात येईल. यातील सहभागी व्यक्ती अगदी घरबसल्या पोस्ट कार्यालय सुरू करू शकतात. यामाध्यमातून तुम्हाला फक्त विविधा योजनांची आणि पोस्टाची माहिती सामान्यांपर्यंच पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला पोस्ट खात्याकडे अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर पुढील १५ दिवसात कार्यवाही करण्यात येईल, कमिशन आधारावर तुम्हाला यातून फायदा होईल. ८ वी उत्तीर्ण असलेले आणि वयाची १८ वर्षे पूर्ण असलेले नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात मात्र यासाठी संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे.
Join Our WhatsApp Community