व्हॉट्सअ‍ॅपवर ‘हे’ मेसेज पाठवलेत, तर थेट जाल तुरूंगात!

237

व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरातील लाखो युजर्स दैनंदिन जीवनात संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांचे प्रमाण वाढत जात असल्यामुळे कंपनीकडून खोडी, आक्षेपार्ह माहिती, फेक न्यूजचा प्रसार केल्यास कठोर भूमिका घेतली जाते. आम्ही तुम्हाला अशाच काही मेसेजबद्दल सांगणार आहोत. जे मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला तुरुगांत सुद्धा जावे लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर विचारपूर्वक संवाद साधणे आवश्यक आहे.

( हेही वाचा : 7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना २०२३ ठरणार लाभदायक; महागाई भत्ता किती वाढेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती)

हिंसक किंवा समाजाच्या भावना दुखावणारे मेसेज

जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप गुप्रमध्ये कोणत्याही प्रकारचा हिंसक मेसेज पाठवत असाल आणि याची तक्रार झाल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. ग्रुपमधील एका व्यक्तीला जरी तुमच्या मेसेज बद्दल आक्षेप असेल तर तो सदस्य थेट तक्रार दाखल करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा मजकूर शेअर करणे टाळा. तसेच युजर्सनी बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारे, त्रास देणारे, द्वेष करणारे मेसेज करू नये यामुळे अकाउंट बॅन होण्याची शक्यता असते.

व्हिडिओ सेंड करताना काळजी घ्या…

व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील चित्रफित (पॉर्न क्लिप) शेअर करण्यावर बंदी घातली आहे. अशी क्लिप शेअर केल्यास युजर्स अडचणीत येऊ शकतात. तसेच तुम्ही एखादा बालगुन्हेगारी संबंधिक व्हिडिओ शेअर केलात तर तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. संवेदनशील विषय असल्याने ग्रुपवर ही चूक केल्यास तुरूंगवास होऊ शकतो.

फेक मेसेज पाठवू नका

कोणत्याही चित्रपटाची पायरेसी लिंक, फेक न्यूज, समाजाच्या भावना दुखावतील अशा बातम्या किंवा २१ दिवसात पैसे दुप्पट करण्याच्या लिंक व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करू नका. एखाद्या व्यक्तीने तुमच्या मेसेज बद्दल तक्रार केल्यास कारवाई होऊ शकते.

हॅकिंगचा प्रयत्न करू नका

सॉफ्टवेअर संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती जरी असली तरीही व्हॉट्सअ‍ॅप सॉफ्टवेअर चुकूनही हॅक करून नका कारण असे केल्यास कंपनीकडून कायदेशीर नोटीस पाठवली जाते.

व्हॉट्सअ‍ॅपचे अनावश्यक बनावट खाते तयार करू नका

व्हॉट्सअ‍ॅपचे बनावट खाते तयार करून लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करू नका, हे गुन्ह्याच्या कक्षेत येते. जर याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली तर तुरूंगवास भोगावा लागू शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.