महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर महामार्गावरून प्रवास करत असाल तर आता टोल नाक्यावर टोल-टॅक्स कापणार नाही. यामुळे टोल नाक्यावरील लांबच लांब रांगेत उभे राहण्यापासून वाहन चालकांची सुटका होणार आहे. यासह सुट्ट्या पैशांवरून कोणत्याही प्रकारचा वाद होण्याचे प्रकार कमी होतील. तर कित्येकदा फास्टटॅगमधील रक्कम संपल्याने म्हणजे त्याचे रिचार्ज न केल्याने वेळेवर पंचायत होणार नाही. दरम्यान, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्ससंदर्भात नियमात मोठा बदल झाल्याची माहिती दिली असून टोल टॅक्स विषयी कायद्याचा प्रस्ताव तयार करण्याची घोषणा केली आहे.
(हेही वाचा – जानेवारीपासून बोंबलायचंय म्हणून सध्या घशाला आराम देतोय, राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण)
काय म्हणाले नितीन गडकरी
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मते, सध्या देशात टोल टॅक्स न भरल्यास कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही. परंतु, रस्ते विकासासाठी निधीची मोठी आवश्यकता असते. त्यासाठी टोल टॅक्स बंद होणार नाही तर तो वसूल करण्याची पद्धत बदलली जाणार आहे. येत्या काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार आहे. टोल टॅक्स वसूलीसाठी तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आणि यासाठी काही पद्धती नवे नियम येणार असल्याचीही माहिती गडकरींनी दिली.
हा असणार नवा पर्याय
टोल टॅक्सबाबत सर्वासाठी कायद्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. टोल टॅक्स न भरणाऱ्या वाहनधारकांना शिक्षेची कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे नवीन कायदेशीर प्रस्तावानुसार, टोल टॅक्स आता थेट तुमच्या खात्यातून कापला जाणार आहे. यामुळे तुम्हाला टोल नाक्यावरील लांब रांगेत तास न् तास थांबावे लागणार नाही, यासह सुट्ट्यापैशांवरून वाद होणार नाही. तसेच फास्टटॅगचा ताण ही संपणार आहे. असे असले तरी टॅक्स भरण्यापासून तुमची कोणतीही सुटका होणार नसून ही रक्कम टोल नाक्यावर कट होण्याऐवजी थेट तुमच्या बँकेतून वळती होणार आहे. तसेच, गडकरी यांनी केलेल्या दाव्यानुसार, २०२४ पर्यंत देशात एकूण २६ ग्रीन एक्सप्रेसवे तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर भारत ग्रीन एक्स्प्रेसवे बाबत अमेरिकेची बरोबरी करणार आहे.
Join Our WhatsApp Community