देशात सामान नागरी कायदा लागू करणारच – अमित शहा

167
देशात समान नागरी कायदा लागू करणे हा आमचा अजंडा पूर्वीपासूनचा आहे. भाजपा त्याआधी जनसंघ यांचा हा अजंडा आहे. त्यामुळे आम्ही देशात सामान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण होताच लागू करण्यात येईल, त्यासाठी संसदेत कायदा पारित करू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

काश्मिरात दहशतवाद्यांना पोसणा-यांचा सुपडासाफ केला

‘भारत जोडो’ यात्रेचे अद्याप राजकीय पातळीवर विश्लेषण करता येणार नाही, तरीही राहुल गांधी फिरत आहेत ही चांगली बाब आहे. कर्नाटकात मागील निवडणुकीत भाजपाला ८ जागा कमी पडल्या होत्या, गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीचा चांगला परिणाम कर्नाटकात पडेल, अशी अपेक्षा आहे. कर्नाटकात कोणताही बदल करण्याचा विचार अजून नाही. काश्मीरमध्ये कालपर्यंत लोकशाही अस्तित्वात नव्हती, देशात पंचायत, विधानसभा आणि संसद अशी त्रिसदस्यीय लोकशाही आहे. मात्र तिकडे कालपर्यंत काश्मीरमध्ये ही व्यवस्था नव्हती, आज नरेंद्र मोदी याच्या सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये ३० हजार सरपंच निवडून आले आणि तिथे लोकशाही खालच्या पातळीपर्यंत पोहचवली. काश्मीरमध्ये कालपर्यंत दशतवाद्यांच्या विरोधात आपण लढत होतो, पण दहशतवादाला पोसणाऱ्यांना कधी हात लावला नव्हता, त्यांचा सुफडासाफ मोदी सरकारच्या काळात केला आहे. ५ वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये ५७ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. तिथे ८० लाख पर्यटक आले आहेत.
पंजाबातील परिस्थितीत हाताबाहेर जाऊ देणार नाही 
पंजाबमध्ये सरकार बदलल्यानंतर परिस्थितीत बदलली आहे, पण तरीही आम्ही तेथील परिस्थितीत हाताबाहेर जाऊ देणार नाही. केंद्र आणि राज्य मिळून त्यावर योग्य पाऊल उचलू. १९४७ पर्यंत भारताला नशामुक्त भारत करण्याचा नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. पाकिस्तानप्रति असलेला खतरा सीमेच्या पलीकडेच ठेवू सीमेच्या आतमध्ये आणू देणार नाही, असे सांगत पीओके हा भारताचाच भाग आहे, असेही अमित शहा म्हणाले. कुणावर अन्याय करणार नाही आणि कुणाचे तुष्टीकरणही करणार नाही. सीएए हा लागू करणारच. देशात ६० टक्के नक्षलवाद संपुष्टात आला आहे. आपल्या देशात तीन स्तरीय न्यायव्यवस्था आहे. संजय राऊत यांच्याबाबत जो निकाल ईडी न्यायालयाने दिला आहे, त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे, असेही अमित शहा म्हणाले. 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.