जळगाव दूध संघ घोटाळ्याप्रकरणी संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना पोलिसांना अटक केली आहे. लिमये यांच्या अटकेमुळे जळगावच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून एकनाथ खडसे समर्थक संचालक मंडळ हे दूध संघात कार्यरत होते. यावेळी कार्यकारी संचालक मनोज लिमये होते तर अध्यक्षपदी मंदाताई खडसे या होत्या. मुदत संपली असतानादेखील संचालक मंडळ पदावर असल्याने भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी हरकत घेतल्याने शासनाने हे संचालक मंडळ बसखास्त करुन शिंदे सरकारने प्रशासक मंडळ या संघावर बसवले होते. यामध्ये प्रशासक म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांचा देखील समावेश आहे. प्रशासक मंडळाने दूध भुकटीमध्ये आणि तुपामध्ये एक कोटीहून अधिक रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. हा अपहार नसून चोरी असल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
( हेही वाचा: उन्नावमध्ये आणखी एक निर्भया कांड; घरात घुसून अत्याचार, रक्तस्त्रावामुळे पीडितेचा मृत्यू )
यानंतर कोणाची अटक?
अगोदरच प्रशासक मंडळ हे बेकायदेशीर असल्याचे सांगत खडसे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. यावेळी न्यायालयाने संचालक मंडळाच्या बाजूने निकाल देत प्रशासक मंडळ बरखास्त केले होते. मात्र, तरीही प्रशासक मंडळाने दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांना तपास करत सोमवारी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक केली आहे. एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लिमये यांच्यानंतर पुढे कोणाचा नंबर लागतो याविषयी आता तर्क वितर्क लावले जात आहेत.
Join Our WhatsApp Community