उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 2024 ला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केला आहे. मी बाहेर असो वा नसो 2024 पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचे रक्त स्वस्त नाही. सध्याचे राजकीय वातावरण अस्थिर आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. आज ( मंगळवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले. राऊतांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिली आणि शिंदे गट आणि विरोधकांवर तुफान फटेकबाजी केली.
( हेही वाचा: ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात तुफान राडा )
महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार
आमच्यावर असे खोटे आरोप आणि खोट्या कायदेशीर कारवाया होत राहतील, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, 2024 पर्यंत आमची लढाई सुरुच राहील. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल. मी तुरुंगाबाहेर असो वा हे लोक पुन्हा मला तुरुंगात टाकू दे, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community