कर्मचारी कपातीमुळे चर्चेत आलेली अॅमेझॉन ही कंपनी भारतात धर्मांतरणासाठी निधी देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये धर्मांतरणासाठी अॅमेझॉन निधी पुरवठा करीत असल्याचा दावा ऑर्गनायझर या मासिकाने केला आहे.
काय केला मासिकाने दावा
ऑर्गनायझर मासिकात ‘द अमेझिंग क्रॉस कनेक्शन’ नावाने प्रकाशित कव्हर स्टोरीत अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीवर ईशान्य भारतातील राज्यांमध्ये धर्मांतरासाठी निधी पुरवल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार अॅमेझॉन कंपनीचे “अमेरिकन बॅप्टिस्ट चर्च” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेशी आर्थिक संबंध आहेत. या चर्च परिसरात कन्व्हर्जन मॉड्युल चालवत असल्याचा दावा मासिकाने केला आहे.
अॅमेझॉनने दिले आरोपांवर उत्तर
मात्र, अॅमेझॉनने हे आरोप फेटाळून लावले आहेत. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चद्वारे चालवल्या जाणाऱ्या ख्रिश्चन कन्व्हर्जन मॉड्यूलला वित्तपुरवठा करत आहे. भारताच्या मोठ्या मिशनरी धर्मांतर मोहिमेला निधी देण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चद्वारे मनी लाँड्रिंग रिंग चालवण्याची शक्यता असल्याचे मासिकाने म्हटले आहे.
(हेही वाचा – इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलकाला फाशी)
एबीएम भारतात ऑल इंडिया मिशन (एआयएम) नावाची संघटना चालवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “ही त्यांची आघाडीची संघटना आहे जी त्यांच्या वेबसाइटवर उघडपणे दावा करते की त्यांनी ईशान्य भारतात 25 हजार लोकांचे ख्रिश्चन धर्मात धर्मातर केले आहे. अॅमेझॉन कंपनी भारतीयांनी केलेल्या प्रत्येक खरेदीवर पैसे घेऊन संपूर्ण भारतात कन्व्हर्जन मॉड्यूलला समर्थन देत असल्याचा दावाही मासिकाने केला आहे. यापूर्वी, हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा असलेल्या उत्पादनांची अॅमेझॉनवर विक्री करण्यात येत असल्याने भारतीयांनी तीव्र नाराजी व्यक्त करत यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community