महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एका गुवाहाटी दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, शिंदे यांच्यासह सर्व समर्थक आमदारही गुवाहाटीला जाणार असून या दौऱ्याची तारीख समोर आली आहे. २१ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सर्व आमदारांसह गुवाहाटी दौऱ्यावर असून यावेळी ते कामख्या देवीच्या दर्शनालाही जाणार आहे.
(हेही वाचा – RBI ची ‘या’ 9 बँकांवर कठोर कारवाई! 12 लाखांचा दंड, यामध्ये तुमच्या बँकेचा समावेश आहे का?)
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याच्या चर्चा होत्या. दौऱ्याची तारीख निश्चित नव्हती अखेर या दौऱ्याची तारीख समोर आली आहे. त्यानुसार, २१ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सर्व आमदारांच्या साथीने कामख्या देवीचे दर्शन घेणार आहे. यावेळी देवीचे दर्शन झाल्यानंतर एका खास पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
कसा असणार मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा एक दिवसाचा दौरा आहे. गुवाहाटीच्या दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व आमदारांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. असेही सांगितले जात आहे की, सत्तांतरादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईल, असे सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या आमदारांसह कामख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुवाहटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा व्यक्तींना भेटणार आहेत. यासह सत्तांतराच्या काळात एकनाथ शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांची भेट देखील घेणार असल्याचे सांगितले जात आहे.