हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हिंदुत्वाचा वारसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १६ नोव्हेंबरला संध्याकाळी ४ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इंदू मील येथे होणारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि महापौर बंगल्यात होणारे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ४ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हिंदुत्वाचा वारसा हा कार्यक्रम होणार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे खासदार राहूल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा घेऊन काही अडचणी असल्यास त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असे शेवाळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री रोजगार निधीच्या माध्यमातून वाटप
संध्याकाळी ४ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणाऱ्या हिंदुत्वाचा वारसा या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात हिंदुत्वाचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार तसेच, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचार मांडले जाणार आहे. या कार्यक्रमानंतर, मुख्यमंत्री रोजगार निधीच्या माध्यमातून चावी वाटप, फूड व्हॅनचे वाटपदेखील करणार आहेत. तसेच, एमपीएससीच्या मुलांना नियुक्त पत्रकदेखील दिले जाणार आहे.
( हेही वाचा: 2024 पर्यंत मविआचा मुख्यमंत्री होणार; संजय राऊतांचा दावा )
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या पुर्वसंध्येला त्यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आशीर्वाद घेणार आहेत. यावेळी भाजप व शिंदे गटाचे पदाधिकारी, आमदार तसेच खासदार उपस्थित राहणार आहेत. स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
Join Our WhatsApp Community