चालकाने अचानक दाबला ब्रेक अन् स्कूल बसमधील मदतनीस महिलेचा झाला मृत्यू

138

पुण्यातील स्कूल बस चालकाच्या निष्काळजीपणाने बसमधील मदतनीस महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहे. चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बसमधील महिला बसमधून अचानक खाली पडली आणि या महिलेचा मृत्यू झाला. बालेवाडी PMPML बस डेपो परिसरात 7 नोव्हेंबर रोजी हा अपघात घडला. याप्रकरणी आता बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडला प्रकार

बसमधून अचानक खाली पडून मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव सुरेखा राजेंद्र सूर्यवंशी असे आहे. बस चालक नागनाथ विठ्ठलराव शाहू याच्या विरोधात चतुर्श्रंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सुरेखा सूर्यवंशी या बालेवाडीतील मिटकॉन इंटरनॅशनल स्कूलच्या स्कूल बसवर मदतनीस म्हणून काम करत होत्या.

(हेही वाचा -पुण्यातील ‘या’ भागात जाणाऱ्या PMPML बसेस होणार बंद!)

समोर आलेल्या माहितीनुसार, 7 नोव्हेंबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बसमधून सोडल्यानंतर सुरेखा या बसमधूनच परत जात होत्या. यावेळी बस चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता निष्काळजीपणे बस चालवली. यामुळे भरधाव वेगात वळून घेऊन जोरात ब्रेक दाबल्याने बसच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या सुरेखा सूर्यवंशी या अचनाक बसमधून खाली पडल्या. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.