हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला. या पराक्रमाची इतिहासात नोंद आहे. त्या पराक्रमाचा पुतळा प्रतापगडावर बसवण्यात यावा, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात आली, त्याची दखल भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली आणि तसे पत्र पर्यटन विभागाला पाठवले.
लाईट अँड साउंड शो सुरु करण्याबाबत प्रस्ताव
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफझलखानाचा कोथळा काढून त्याला ठार केले होते. हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याप्रसंगाची इतिहासात महत्वाची नोंद आहे. जी आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित करीत असते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा काढतानाचा पुतळा (शिवप्रताप स्मारक) उभारण्यासाठी तसेच लाईट अँड साउंड शो सुरु करण्याबाबत ‘हिंदू एकता आंदोलन, सातारा’ आणि इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली आहे. त्याची दखल घेत या मागणीची संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तात्काळ प्रस्ताव मागविण्यात यावा, शिवभक्तांची मागणी लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफझलखानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे, असे मंत्री लोढा म्हणाले.
(हेही वाचा आफताबची आणखी एक क्रूर कृती, ४ हिंदू मुलींसोबत होते संबंध?)
Join Our WhatsApp Community