काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रात आलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करून सावरकर द्वेष दाखवून दिला आहे. वाशिममध्ये बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा यांची वीर सावरकर यांच्याशी तुलना करताना अकलेचे तारे तोडले. वयाच्या २४ व्या वर्षी बिरसा मुंडा यांनी भारतासाठी हौतात्म्य पत्करले, असे सांगताना वीर सावरकर यांनी मात्र इंग्रजांची माफी मागितली, असा चुकीचा आणि खोटा उल्लेख केला. यावरून सावरकर प्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
वस्तुस्थिती काय?
वीर सावरकर यांच्या शेवटच्या ब्रिटिशांना दिलेल्या आवेदन पत्रावरून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात प्रत्येक आवेदन पत्रात वीर सावरकर यांनी ‘जर माझ्या मुक्ततेला तुमचा विरोध असेल, तर अन्य राजबंदींची तरी तुम्ही मुक्तता करा’, अशी भूमिका मांडलेली आहे. सावरकरांनी आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रात या अर्जांचा उल्लेख केला आहे. १० वर्षांत त्यांनी अशी ७ पत्रे लिहिली आहेत. त्यात व्यक्तिगत काही लिहिलेले नाही. ती सर्व पत्रे ब्रिटिशांकडून आधी तपासली जात. त्या पत्रांमध्येही वीर सावरकर यांनी त्यांची ब्रिटिशांकडे अर्ज करण्यामागील भूमिका स्पष्ट केली आहे.
गांधी-नेहरूच खरे माफीवीर
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी गांधींनी आंदोलन मागे घेणे आणि त्यानंतर ‘यापुढे माझे आंदोलन देशवासीयांच्या विरुद्ध असेल’, असे लिहिणे, तसेच देशवासियांना असहकार आंदोलनाच्या नावाखाली आयकर भरायला न लावणे आणि दुसरीकडे त्याच वेळी नेहरूंनी स्वतः आयकर भरणे आणि स्वतःच्या वडिलांनाही पत्र लिहून आयकर भरण्यास सांगणे, या सर्व घटना खऱ्या अर्थाने मोहनदास करमचंद गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा माफीनामा होता, जनतेशी विश्वासघात होता, ब्रिटिशांप्रती त्यांची हुजरेगिरी होती, अशी भूमिका सावरकरप्रेमी मांडत आहेत.
Join Our WhatsApp Community