प्रतापगडावर असलेल्या अफजल खानाच्या थडग्याभोवतीचे अनधिकृत बांधकाम राज्य सरकारकडून हटवण्यात आले. राज्य सरकारच्या या निर्णयाचे तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातील जनतेकडून स्वागत होत असतानाच आता किल्ल्यांवरील कचरा कमी करण्यासाठी राज्याच्या वन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. किल्ले सिंहगडावरील कचरा कमी करण्यासाठी किल्ल्यावर खाद्यपदार्थांची विक्री करण्यास वन विभागाने बंदी घातल्याची माहिती मिळत आहे.
खाद्यपदार्थांचा कचरा
महाराष्ट्रातील किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि ट्रेकर्स दुर्गदर्शनासाठी येत असतात. त्यामुळे किल्ल्यांच्या परिसरात असणा-या विविध स्टॉल्सवर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. या खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सचा कचरा मोठ्या प्रमाणआवर किल्ल्याच्या परिसरात टाकला जातो.
(हेही वाचाः 10वी व 12वीच्या परीक्षांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, 2023 च्या परीक्षा ‘या’ पद्धतीने होणार)
वन विभागाचा निर्णय
त्यामुळे महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरते. याबाबत स्थानिकांकडून देखील प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने सिंहगड किल्ल्यावर वेफर्स आणि नूडल्स यांसारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घातल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच इतरही किल्ल्यांबाबत लवकरच अशाप्रकारचा निर्णय घेण्यात येईल अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Join Our WhatsApp Community