अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता त्या ठिकाणी…

156

अलीकडेच किल्ले प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे. सरकारकडून रातोरात या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींकडून होत असलेल्या मागणीवर सरकारने कार्यवाही केली. खानाच्या कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामावर सरकारने बुलडोजर फिरवला. सरकारने उचललेल्या या पाऊलाचे शिवप्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.

( हेही वाचा: श्रद्धापेक्षा भयंकर अनुपमाची कहाणी! ७२ तुकडे केले, फ्रीजरमध्ये ठेवले आणि… )

त्यानंतर आता पर्यटन विभागाकडून किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट, साऊंड शो सुरु करण्याबाबत विचार करत आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सचिवांना पत्र पाठवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. या पत्रात म्हटलंय की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करुन आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याप्रसंगी इतिहासात महत्वाची नोंद आहे, असा त्यांनी उल्लेख केला.

शिवप्रेमींची मागणी पूर्ण होणार 

तसेच, आजही शिवभक्तांना ही घटना प्रेरित करत असते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी तसेच लाईट- साऊंड शो सुरु करण्याबाबत हिंदू एकता आंदोलन, सातारा व इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली आहे. त्यावर संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तत्काळ प्रस्ताव मागवण्यात यावा, असे आदेश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.