प्रतापगडावर अफजल खानच्या कबरी शेजारील अतिक्रमण काढल्यानंतर आता पुण्यातील शनिवारवाडा येथील पटांगणात असेलल्या हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी याचा जो दर्गा आहे, तो दर्गा अनधिकृत असून याचा इतिहासाशी काहीही संबंध नाही तेव्हा हा दर्गा हटवण्यात यावा, अशी मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.
तो दर्गा 1244 साली बांधण्यात आला आहे असा बोर्ड याठिकाणी लावण्यात आला आहे. वाड्याच्या पटांगणात जो दर्गा आहे तो अनधिकृत असून तो दर्गा हटवण्यात यावा तसेच, प्रतापगडावर जिवा महाला यांचे स्मारक असावे या आमच्या मागण्या आहेत, असे यावेळी दवे यांनी सांगितले.
( हेही वाचा: बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात राहुल गांधींनी तोडले अकलेचे तारे )
…तर मग जिवा महाला यांचे स्मृतीस्थळ का नाही?
शनिवार वाड्याचा मुख्य दरवाज्याजवळ सुद्धा अगदी वाड्याच्या अंगणात पण एक छोटा दर्गा गेल्या अनेक वर्षांत दिसायला लागला आहे. वाड्याच्या इतिहासात असा कोणताही दर्गा असल्याचा उल्लेख नाही आणि तसा तो असणे शक्य पण नाही. हे बांधकाम आपण पाहिले तर ते साधारण 30 वर्षांपूर्वीच टाईल्स वापरुन केले आहे. हा वाडा पुरातत्व खात्याच्या अधिकाराअंतर्गत येत असल्याने ते अशा कोणत्याही बांधकामाला परवानगी देतील किंवा देऊ शकतील अशी शक्यता नाही. त्यामुळे या दर्ग्यांचे सदृश्य छोटे बांधकाम पाडून टाकावे. भविष्यात इथे सुद्धा अतिक्रमण होऊन वाड्याच्या सुरक्षिततेला आणि सौंदर्यला बाधा येऊ शकते आणि हिंदवी साम्राज्याच्या वास्तूचे महत्त्वसुद्धा कमी होऊ शकते. तसे निवदेन पुरातत्व खाते आणि अतिक्रमण खात्याला दिले आहे. तसेच, सैय्यद बंडाची कबर होऊ शकते तर आमच्या जिवा महाला यांची का नाही ? असे देखील दवे यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community