‘स्टार’ फिरले??? काँग्रेसने थरुरांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले

118

गुजरात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर आता प्रचाराची धामधूम सुरू झाली आहे. पण या प्रचारादरम्यान आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांना पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. यामुळे नाराज झालेल्या थरुर यांनी आता गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी येणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये काँग्रेस कमकुवत होऊ शकते, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

थरुर नाराज

स्टार प्रचारकांच्या यादीतून शशी थरुर यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे थरुर प्रचंड नाराज असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने थरुर यांना प्रचारासाठी आमंत्रित केले होते. पण संतापलेल्या थरुर यांनी प्रचारापासून अल्पित राहण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत थरुर किंवा काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

(हेही वाचाः विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कारचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल,तपासात काय आले समोर?)

‘हे’ नेते स्टार प्रचारक

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारासाठी काँग्रेसने मंगळवारी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,माजी अध्यक्ष सोनिया गांधी,राहुल गांधी,प्रियंका गांधी,राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल,हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा,दिग्विजय सिंह,सचिन पायलट,कमलनाथ यांच्यासह काँग्रेसमधील 40 दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मात्र या यादीतून थरुर यांना वगळण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.