बेस्ट कर्मचारी संघटनांना मोठे यश; दहिसर प्रकरणात ४ जणांना अटक

129

दहिसर पूर्व येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेत बेस्ट कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्यावतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. बेस्ट कामगारांना ड्युटीवर असताना संरक्षण मिळावे आणि संबंधित आरोपींनी शिक्षा व्हावी यासाठी हे निवेदन देण्यात आले होते.

( हेही वाचा : पेन्शन धारकांना SBI बॅंकेने दिले मोठे गिफ्ट! घरबसल्या होईल ‘हे’ काम, बॅंकेतही जायची गरज नाही)

४ जणांना अटक

या निवेदनानुसार आता संबंधित घटनेप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
बसवर दगडफेक होत असताना परिसरातील नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला. या व्हायरल व्हिडिओद्वारे बेस्टच्या चालक-वाहकांना या कार चालकाने व साथीदारांनी बेदम मारहाण केल्याचे दिसून येत आहे. यामुळे कर्मचारी संतप्त झाले होते. घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व कामगारांनी एकत्र आले पाहिजे आणि कार चालक तसेच साथीदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. यानुसार समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्यावतीने या आरोपींवर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले आणि आता ४ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

New Project 10 4

नेमके काय आहे प्रकरण? 

दहिसरमध्ये सोमवारी १४ नोव्हेंबरला रात्री बसवर दगडफेक केल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये बेस्ट बसच्या काचा फोडल्या सुद्धा फोडण्यात आल्या, बेस्ट बसची एका कारला टक्कर लागल्याने कार चालकाने आपल्या साथीदारांना बोलावून ही दगडफेक केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.