सध्या काही जण राज्यातील उद्योग गुजरात आणि इतर राज्यात जात आहेत, असा आरोप करत आहेत. पण कोणताही उद्योग हा काय १-२ महिन्यांत राज्याबाहेर जात नाही, ही काय जादूची कांडी नाही, असा घणाघात करत राज्यात मागील अडीच-तीन महिन्यांत अनेक नवीन उद्योग राज्यात आले आहेत, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले.
राज्यात १ हजार कौशल्य विकास केंद्रे उभारणार
राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रोजगार हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, अतिशय संवेदनशील विषय आहे. नोकऱ्या करणाऱ्यांबरोबर नोकऱ्या देणारे हात निर्माण करा, असे सांगत आज १ लाख ३० हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या दृष्टीने कार्यक्रम हाती घेणार आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी उद्योगपतींसोबत समंजस्य करार करत आहोत. मंगलप्रभात लोढा हे रोजगार निर्मिती खात्याचे योग्य प्रकारे संचालन करत आहेत, येत्या सहा महिन्यांत राज्यात १ हजार कौशल्य विकास केंद्रे उभारण्यात येणार आहे. नवीन उद्योजक आपल्याकडे यायला पाहिजेत. अडीच – तीन महिन्यांत अनेक उद्योगपती महाराष्ट्रात आले आहेत, त्यांनी गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्राची मोठी क्षमता आहे, पायाभूत सुविधा आहे, राज्यात उद्योगांना अनुकूल वातावरण आहे. सरकारने ९५ हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता त्या ठिकाणी…)
ग्रामीण भागात जॉब फेअर घेणार
एमओयू करून तरुणांच्या हाताला काम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकार जॉब फेअर घेत असतो, आता ते जॉब फेअर ३ पट घेतले जाणार आहेत. हे सगळे जॉब फेअर ग्रामीण भागात घेणार आहे. त्यामाध्यमातून जमलेल्या तरुणांच्या माहितीचा आम्ही मानव संसंसाधनाच्या माध्यमातून उपयोग करणार आहे. उद्योग, सेवा क्षेत्राशी कृषी क्षेत्र जोडले तर विकास होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community